
<p>आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, "माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग." सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, "राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते." मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, "मानवाचं ज