
श्रोतेहो नमस्कारछापील स्वरूपातल्या अंकासह आधुनिक युगातल्या विविध माध्यमांमधून समाजप्रबोधनाचं काम करणारा समूह - अशी विवेक समूहाची, प्रसारमाध्यमातली ओळख. या सगळ्या प्रवासात तुमची डोळस साथ लाभली हे आमचं भाग्य. अनेक संमिश्र अनुभव आपल्या झोळीत टाकणारं 2021 मावळत असताना, आणि 2022 उंबरठ्यावर उभं असताना, पॉडकास्ट - या आणखी एका आधुनिक माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. विवेकवाणी - हे या श्राव्य माध्यमातलं आमचं नाव. या माध्यमातून काही दर्जेदार साहित्यकृतींचं तसंच गाजलेल्या लेखमालांचं अभिवाचन, महत्त्वाच्या मुलाखतींचं प्रसारण आणि आणखीही बरंच काही तुमच्यापर्यंत पोचवायचा विचार आहे.